राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रविवारी मोरवाडी-पिंपरी व सांगवीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रविवारी मोरवाडी-पिंपरी व सांगवीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने रविवारी (ता. ३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रम मोरवाडी-पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये व काही कार्यक्रम सांगवीमध्ये होणार आहेत.
मोरवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमांत पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या प्रथम ११ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या २०० विद्यार्थ्यांना २० फुलस्केप वह्यांचा संच वाटप करण्याचा विशेष कार्यक्रम होईल. राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन करुन नागरीकांनी या प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सव समितीने केले आहे.
कार्यक्रमांची माहिती अशी.......
धनगरी गजनृत्य - सकाळी ८:३० - स्थळ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळा, सांगवी
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगवी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण हस्ते : सन्माननीय महापौर व सन्माननीय आयुक्त - सकाळी ११:००
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित ६० कलाकारांनी सादर केलेले भव्य महानाट्य "पुण्यश्लोक"
निळू फुले नाट्यगृह, सांगवी - रात्री ९:०० ते १२:००
खालील सर्व कार्यक्रम मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात होतील. ....
- भव्य रक्तदान शिबीर प्रत्येक रक्तदात्यास ₹ ५ लाखांचा अपघात विमा- सकाळी ९:०० ते ५:००
- "सामना" या मुंबई येथील १५० कलाकारांचा गाजलेल्या ढोल-ताशा पथकाचे दमदार सादरीकरण - सकाळी ९:३० ते ११:३०
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महापालिका सभागृहातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण हस्ते : सन्माननीय महापौर व सन्माननीय आयुक्त - सकाळी १०:३०
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मोरवाडी, पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण हस्ते : सन्माननीय महापौर व सन्माननीय आयुक्त - सकाळी १०:४५
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार वितरण समारंभ - सकाळी ११:०० ते १२:३०
- अवघारंग संस्कृती संघ, कोल्हापूर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम - दुपारी १२:३० ते २:३०
- शिवदर्शन सांस्कृतिक शाहीरी संघ, शाहीर सुरेश होनाजी जाधव व त्यांच्या १८ कलाकारांद्वारे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित शाहीरी कार्यक्रम - दुपारी २:३० ते ४:३०
