नगरसेवकांना मिळाली महापालिका कामकाजाची सखोल माहिती, पुणे महापालिकेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग

नगरसेवकांना मिळाली महापालिका कामकाजाची सखोल माहिती, पुणे महापालिकेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग

नगरसेवकांना मिळाली महापालिका कामकाजाची सखोल माहिती, पुणे महापालिकेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग 

पुणे, ता. ३० - पुणे महानगरपालिकेतर्फे सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग पार पडला. लोकप्रतिनिधींना पुणे महानगरपालिकेच्या कामकाजाची सखोल माहिती, प्रशासनातील विविध प्रक्रिया, विकासकामांचे नियोजन, आर्थिक बाबी तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी मार्गदर्शन या प्रशिक्षण वर्गामध्ये करण्यात आले. 

महापालिकेच्या सभागृहामध्ये झालेल्या या प्रशिक्षण वर्गाला प्रसंगी पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

या महत्वपूर्ण प्रशिक्षण वर्गात पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त  शेखर गायकवाड,  माजी आयुक्त कुणाल कुमार, पुणे शहराचे माजी महापौर अंकुश काकडे, पुणे मनपाचे  शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माजी मुख्य लेखापरीक्षक अमरीश गालींदे तसेच माजी नगरसचिव  सुनील पारखी यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. 

प्रशासनातील अनुभव, विकासकामांचे नियोजन, महापालिकेची कार्यपद्धती आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे कसे कार्य करावे याबाबत आपले अनुभव आणि विचार मांडले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे  माजी आयुक्त  शेखर गायकवाड यांचा प्रशासनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories