दिल्लीमध्ये 'एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी कॉंग्रेसचा निषेध,  भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन 

पिंपरी, ता. २१ - दिल्लीमध्ये नुकतेच 'ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिट'चे उद्घाटन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या परिषदेसाठी भारतात आले आहेत. हा देशासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. मात्र, या अभिमानाच्या प्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिषदेच्या ठिकाणी घुसखोरी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार भारत सरकारची बदनामी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांची प्रतिमा खराब करण्यासाठीच केल्यासारखा दिसतो, असा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कॉंग्रेसचा निषेध करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. धी आणि काँग्रेसच्या निषेधार्थ पिंपरी येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारुन कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, ''एआय आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जगभर ओळख वाढत असताना, कॉंग्रेसचे अशा प्रकारचे वर्तन चुकीचा संदेश देते. जग भारताला तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून पाहत आहे. अशा वेळी प्रचंड महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अडथळे निर्माण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची कृती फक्त टीका नव्हती, तर जाणीवपूर्वक देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होता. राजकारण करायचे असेल तर ते देशाच्या प्रतिमेच्या किंमतीवर नसावे. आज युवक स्टार्टअप्स, इनोव्हेशन आणि टेक्नोलॉजीच्या माध्यमातून भारताला पुढे नेत आहेत. त्यांच्यासमोर गोंधळ आणि घुसखोरीचे उदाहरण ठेवणे योग्य नाही. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण अव्यवस्था असू नये. अशा गोंधळामुळे तुमची सडकी मानसिकता तरुणाईसमोर उघड होते आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि राहुल गांधींनी समजून घ्यायला हवे. काहीही सकारात्मक काम न करता फक्त मोदीजींवर टीका करणे हाच काँग्रेस आणि राहुल गांधींचा एकमेव अजेंडा राहिला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. ''

या निषेध आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे , भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव , शहर समन्वयक अजित कुलथे , शहर सरचिटणीस उदय गायकवाड , राहुल खाडे , प्रसाद कस्पटे , सुमित घाटे , दिनेश काटे , सम्यक साबळे , साची दोशी , युवा मोर्चा उपाध्यक्ष देवयानी भिंगारकर , अतुल बोराटे, मयूर काळभोर, उमेश सांडभोर , सागर घोरपडे, आदम मुलानी , अभिजीत बागुल, मनोज घोडेकर, विशाल वाघेरे, राजेश चौधरी , रवी भिलारे, दीपक शिंदे, साईराज भालेकर, सुशांत पवार, अमीर शेख, गौरव शिरुडे, आशिष राऊत, निखिल शहाणे, जयदीप करपे, शैलेश स्वामी, विजय पवार, ओमकार पवार, प्रतीक भालेराव, अथर्व देवके , आकाश वाळके, रवी पारखे ,अतुल काळोखे,अजय साने, साईराज भालेकर, ऋषिकेश भालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance