अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा – जनसेवा सप्ताह’

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा – जनसेवा सप्ताह’

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा – जनसेवा सप्ताह’

पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त‘अजितदादा – जनसेवा सप्ताह’ प्रभाग क्र. १७ मधील नागरिकांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका  विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर, नगरसेवक शेखर बबनराव चिंचवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते धनंजय तानाजी वाल्हेकर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले आहे. 

शासन योजना, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसमावेशक जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  नागरिकांनी या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

शिबिराचे वेळापत्रक -

१) शासन आपल्या दारी

राज्य शासनाच्या विविध पेन्शन योजना व शासकीय दाखले

स्थळ : आहेर लॉन्स, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे-३३

दिनांक : २२ जुलै २०२६, सायं. ५.०० वा.


२) ‘अजितदादा – सावली देणारा माणूस’भव्य वृक्षारोपण अभियान

स्थळ : रिव्हर व्ह्यू चौक ते वाल्हेकरवाडी चौक

दिनांक : २२ जुलै २०२६, सकाळी ११.०० वा.

स्थळ : दळवीनगर ते एस.के.एफ. कंपनी रस्ता

दिनांक : २७ जुलै २०२६, सकाळी ११.०० वा.


३) एसटी डिजिटल कार्ड शिबिर

नागरिकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ आपल्या दारी!

स्थळ : तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी

दिनांक : २२ जुलै २०२६, सकाळी १०.०० वा.


४) मोफत आरोग्य शिबिर

नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

स्थळ : भोलेश्वर मंदिर, चिंचवडेनगर

दिनांक : २३ जुलै २०२६, सकाळी १०.०० वा.


५) स्वच्छता महाअभियान

स्थळ : गुरुमैया शाळा, चिंचवडेनगर ते संकल्प चौक

दिनांक : २४ जुलै २०२६, सकाळी १०.०० वा.


६) वारकरी भोजन सेवा

पवित्र आषाढ महिन्यानिमित्त श्री भोजन सेवा

स्थळ : विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वाल्हेकरवाडी

दिनांक : २५ जुलै २०२६, सकाळी ११.०० वा.


७) इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन

स्थळ : ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, सेक्टर क्र. २५, प्राधिकरण, बिजलीनगर पुलासमोर, आकुर्डी, पुणे.

दिनांक : २६ जुलै २०२६, सकाळी ९.३० वा.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories