दिव्यांग बांधवांसाठी सेवाभावी उपक्रम, मोफत कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स वाटप

दिव्यांग बांधवांसाठी सेवाभावी उपक्रम, मोफत कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स वाटप

दिव्यांग बांधवांसाठी सेवाभावी उपक्रम, मोफत कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स वाटप 

पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, महापौर रवी लांडगे, ॲसिम्को, एस. आर. ट्रस्ट आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर मोरवाडी-पिंपरी येथील दिव्यांग भवनामध्ये बुधवारी (ता. २२) सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत होणार आहे. समाजातील गरजू दिव्यांग बांधवांना सक्षम, स्वावलंबी आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गरजू दिव्यांग बांधवांनी या मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories