माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष ‘स्वच्छता अभियान’

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात  विशेष ‘स्वच्छता अभियान’

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात  विशेष ‘स्वच्छता अभियान’

पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ -  दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे २२ जुलैपासून १५ दिवसीय विशेष ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात येणार आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकारातून शहभर हे अभियान लोकसहभागातून राबविण्यात येणार असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामार्फत सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, पदपथ, चौक आणि क्रॉनिक स्पॉटची विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, युवक मंडळे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार आहे.

अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रथम रुपये ५० लाख, द्वितीय रुपये २५ लाख आणि तृतीय रुपये १५ लाखांची विशेष पारितोषिक योजना जाहीर करण्यात आली आहे.

बैठकीस  महापौर  मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर,  विरोधी पक्षनेते  निलेश निकम, आयुक्त  नवल किशोर राम,  अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर तसेच माजी महापौर, नगरसेवक, उपआयुक्त आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व पुणेकरांना या विशेष स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छ, सुंदर, हरित आणि निरोगी पुणे घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories