news
clock
अखंड हरिनाम सप्ताहाने चिखलीच्या घरकुल वसाहतीत भक्तीचा जागर

अखंड हरिनाम सप्ताहाने चिखलीच्या घरकुल वसाहतीत भक्तीचा जागर

अखंड हरिनाम सप्ताहाने चिखलीच्या घरकुल वसाहतीत भक्तीचा जागर  

पिंपरी, ता. २१ - समस्त घरकुलवासी व शिव–पार्वती भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय, मंगलमय वातावरणात पूर्ण झाला. सप्ताहाचे यंदाचे ११ वर्ष होते. 

गोकुळधाम-वृंदावन येथील साध्वी देवी वैभवीश्रीजी दीदी यांच्या उपस्थितीत दररोज सायंकाळी झालेल्या सुश्राव्य संतचरित्र कथन व भागवत कथामृत कार्यक्रमातून श्रोत्यांचे ज्ञानार्जन झाले. भक्ती, वैराग्य, सदाचार व संस्कार या मूल्यांची शिकवण मिळाली. देवी वैभवीश्रीजी दीदींनी या सप्ताहात संत परंपरेचा वैभवशाली वारसा उलगडत संत भानुदास, संत मीराबाई, संत नामदेव, संत सूरदास, संत मुक्ताबाई, संत कबीर, संत गुलाबराव महाराज व संत तुकाराम महाराज या संताचे जीवनकार्य व विचार श्रोत्यांना सांगितले. 

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सामूहिक हरिपाठ, ग्रंथ पारायण, महिला व पुरुष वारकरी भजन मंडळांचे सुमधुर भजन, हरिनाम संकीर्तन तसेच महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

‘जय जय राम कृष्ण हरि’, ' ज्ञानोबा माऊली तुकाराम' व ‘ओम नमः शिवाय’ या अखंड नामजपाने परिसरात भक्तिच्या लहरी पसरल्या. राधा-कृष्ण विवाह सोहळ्याचे सादरीकरण हे सप्ताहाचे आकर्षण ठरले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संत तुकाराम महाराज चरित्र कथन कार्यक्रम झाला व यावेळी संत तुकाराम महाराज व त्यांचे चौदा वारकरी या वेशभूषेत भाविक सहभागी झाले होते. या कार्यक्रमामुळे सप्ताह स्मरणीय ठरला. 

सप्ताहातील सर्व कार्यक्रमांना घरकुल वसाहतीतील भाविकांचा सहकुटुंब उत्सू्र्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली. घरकुलवासी युवक–युवती, महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून घेतलेल्या परिश्रमांमुळे हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीपणे पार पडला. समारोपप्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories