'महा ट्रान्सको'मध्ये उपअभियंता पदी निवड झाल्याबद्दल अक्षय खरसे यांचा सोहम अभ्यासिकेतर्फे सन्मान
Jul 03 2026
12
'महा ट्रान्सको'मध्ये उपअभियंता पदी निवड झाल्याबद्दल अक्षय खरसे यांचा सोहम अभ्यासिकेतर्फे सन्मान
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका येथील विद्यार्थी अक्षय बाबासाहेब खरसे यांची 'महा ट्रान्सको'मध्ये उपअभियंता स्थापत्य विभाग श्रेणी टू (असिस्टंट इंजिनियर सिविल क्लास 2) महाराष्ट्र मधून तिसऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे. त्यांचा त्यानिमित्ताने सोहम सार्वजनिक ग्रंथालयातर्फे उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल शेटे, ग्रंथालयाचे संस्थापक-अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, ग्रंथपाल वर्षा बोरसे व रुकसाना नदाफ उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अक्षय खरसे यांचा शाल, सन्मान चिन्ह व 'पिंपरी चिंचवड चा इतिहास' हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अक्षय खरसे यांनी पुढील मनोगत व्यक्त केले, माझ्या यशात सोहम अभ्यासिका व नेरकर सरांचे मार्गदर्शन याचा मला लाभ झाला. खडतर परिश्रम व बारा बारा तास अभ्यास व अभ्यासाचे नियोजन या मुळे मला यश मिळाले, असे अक्षय यांनी सांगितले.
या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुढील मनोगत व्यक्त केले. ''जिद्द व मेहनती मुळे यश मिळविता येते.स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांनी प्रशासकीय क्षेत्राकडे गांभीर्यपूर्वक पाहून जिद्द चिकाटीची कास धरावी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना वेळ आणि अभ्यासाचे नियोजन महत्त्वाचे आहे.'', असे त्यांनी सांगितले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. परमेश्वर तेलंगे यांनी आभार मानले. या प्रसंगी स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी उपस्थित होते.
- सोहम सार्वजनिक ग्रंथालय, Soham Public Library, सोहम अभ्यासिका, Soham Study Library, पिंपरी, Pimpri, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, महाराष्ट्र, Maharashtra
- महा ट्रान्सको, MSETCL, Maharashtra State Electricity Transmission Company Limited, उपअभियंता, Assistant Engineer, Assistant Engineer Civil Class 2, स्थापत्य अभियंता, Civil Engineer, स्पर्धा परीक्षा
- अक्षय खरसे, Akshay Kharse, यश