news
clock

 गंगानगर परिसरात मोबाईल टॉवरला आग

पिंपरी, ता. १० - आकुर्डी येथील गंगानगर परिसरात एका मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी (ता. ९) घडली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास टॉवरमधून आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. परिसरात काही काळ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

मात्र, मोबाईल टॉवरला आग लागण्याचे नेमके कारण रात्री उशीरापर्यंत समजू शकले नव्हते. पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories