news
clock
शासकीय गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत  श्री म्हाळसाकांत विद्यालयास 'अ' श्रेणी

शासकीय गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत श्री म्हाळसाकांत विद्यालयास 'अ' श्रेणी

शासकीय गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत  श्री म्हाळसाकांत विद्यालयास 'अ' श्रेणी

पिंपरी, ता. २४ - महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत आकुर्डीतील श्री म्हाळसाकांत विद्यालयाने 'अ' श्रेणी प्राप्त केली आहे.

मानांकनामध्ये शाळेचे शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, सहशालेय उपक्रम तसेच शालेय प्रशासन यांचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व निकषांवर विद्यालयाने कामगिरी केली आहे.

विद्यालयात राबविले जाणारे नवोपक्रम, आधुनिक शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, डिजिटल सुविधा, शिक्षणात एआय चा वापर अशा विविध विभागांद्वारे होणारे कौशल्य विकास उपक्रम यामुळेच हे यश मिळाल्याचे मत विद्यालयाचे प्रा. भानुदास मालुसरे यांनी व्यक्त केले आहे.

याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, संदीप कदम, एल. एम. पवार, मोहनराव देशमुख तसेच शैक्षणिक संशोधन व मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे, शशिकांत सात्रस यांचे व्यवस्थापनाने अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories