news
clock
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेतर्फे २७ फेब्रुवारीला अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेतर्फे २७ फेब्रुवारीला अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेतर्फे २७ फेब्रुवारीला अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन

परिसंवाद, कवीसंमेलन अन् संगीत मैफल, नागरीकांना सहभागी होण्याचे आवाहन 

पिंपरी, ता. २५ - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत  महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २७) शुक्रवारी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी १० वाजता मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे उद्घाटन होईल, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

यावेळी,  उद्घाटन सत्रात ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा नागरी सन्मान होईल. दुपारी १२ वाजता 'माय मराठीची गौरवगाथा', दुपारी ३ वाजता निमंत्रितांचे कवीसंमेलन, दुपारी ४ वाजता 'अभिजात मराठी भाषेचे वैभव' विषयावर परिसंवाद आणि  सायंकाळी ६ वाजता 'आवाज लोकगीतांचा... गंध मराठी मातीचा...' कार्यक्रम होईल. मायमराठीचा गौरव करण्यासाठी नागरीकांनी आवर्जून या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महपालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

आज बुधवारी, प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील ऑटोक्लस्टर ऑडिटोरीअममध्ये 'पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा उपयोग' या विषयावर सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांचे व्याख्यान होणार आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories