गांजा बाळगणाऱ्या महिलेला आकुर्डीतून अटक, १७ हजारांचा गांजा जप्त
पिंपरी, ता. २१ - गांजा बाळगणाऱ्या ५८ वर्षीय महिलेला शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खंडोबामाळ-आकुर्डी येथून बुधवारी (ता. २०) अटक केली. तिच्याकडून एकूण १७ हजार २००/- रुपये किंमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला आरोपी निगडी पोलीस स्टेशन हददीत खंडोबामाळ आकुर्डी येथे सत्यम फॅब्रीकेशन शेजारील अंतर्गत गल्लीमध्ये आढळली. तिने एकूण १७,२००/- रुपये किंमतीचा ३४४ ग्रॅम गांजा बेकायदेशिररित्या विक्रीकरता जवळ बाळगला होता. या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्यावर निगडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.