ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी देहूरोड येथील संजय डुमडे यांची निवड
ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी देहूरोड येथील संजय डुमडे यांची निवड
पिंपरी, ता. ११ - सी.ओ.डी. (Central Ordnance Depot)देहूरोड येथील सी.ओ.डी. वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष संजय जगदीश डुमडे यांची ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
सी.ओ.डी. देहू रोडच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कामगार प्रतिनिधीला राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. ज्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन चे २८ वे त्रैवार्षिक अधिवेशन ७ ते ९ मे २०२६ या कालावधीत उत्तराखंडमधील देहरादून येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात देशभरातील संरक्षण विभागातील विविध युनिट्सच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी फेडरेशनची पुढील तीन वर्षांसाठी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये, एस. एन. पाठक यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी, सी. श्रीकुमार यांची राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून पुनर्निवड करण्यात आली. तसेच हरभजन सिंह सिद्धू (उपाध्यक्ष), आर. एस. रेड्डी (जॉइंट सेक्रेटरी) आणि शमोहन होळ (कोषाध्यक्ष) आणि कार्यकारिणी सदस्यांमध्ये संजय जगदीश डुमडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी ही निवड करण्यात आली.
- national level recognition, labor leadership, triannual convention,
- worker representation, COD Dehuroad, trade union
- national executive committee, All India Defence Employees Federation
- राष्ट्रीय स्तरावर कामगार प्रतिनिधी, त्रैवार्षिक अधिवेशन, देहरादून, संरक्षण विभाग,
- संजय डुमडे, देहूरोड, सी.ओ.डी. देहूरोड, C.O.D. Workers Union, उपाध्यक्ष,
- ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन, राष्ट्रीय कार्यकारिणी