news
clock
जुन्या आठवणींना उजाळा देत... रंगला महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जुन्या आठवणींना उजाळा देत... रंगला महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जुन्या आठवणींना उजाळा देत... रंगला महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 

पिंपरी, ता. ७ - जुन्या आठवणींना उजाळा देत... पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या कला विकास विद्यार्थी मंचाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 

खडकवासला येथील निसर्गरम्य परिसरात हा मेळावा झाल्याने सर्वांनी छोट्याशा सहलीचाच अनुभव घेतला.  अनेक वर्षांनी परस्परांना भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी महाविद्यालयातील दिवस, कट्ट्यावरच्या गप्पा, वर्गातील किस्से आणि विविध उपक्रमांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच परस्परांची वाटचाल जाणून घेतानाही सर्वांना अभिमान वाटला. मेळाव्यात विविध मनोरंजनात्मक खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी उत्स्फूर्तपणे खेळांमध्ये सहभाग घेतला आणि माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा चिरस्मरणीय ठरला. 

या प्रसंगी समीर आबनावे, लीना माने आणि शर्मिला डोंगरे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल अहिरे यांनी केले.  गणेश मोकाटे व भरत पवार यांनी सूत्रसंचालन केले. महात्मा फुले कॉलेज कला विकास विद्यार्थी मंचाने या स्नेहमेळाव्याचे सुंदर संयोजन केले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories