व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने १४ ते २२ एप्रिलपर्यंत निवड चाचणी
पिंपरी, ता. ७ - 'पीसीएमसी'ज व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने थेरगाव येथे सन २०२६-२७ साठी १४ ते २२ एप्रिलपर्यंत निवड चाचणी होणार आहे. अकादमीच्या थेरगाव येथील मैदानावर ही निवड चाचणी पार पडेल.
इच्छुक खेळाडूंनी सफेद क्रिकेट गणवेश, क्रिकेट साहित्य, जन्मतारखेचा मूळ दाखला आणि आधारकार्डासह उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीने केले आहे. १४ एप्रिलला २३ वर्षांखालील मुलांसाठी आणि १५ एप्रिलला १९ वर्षांखालील मुलांसाठी दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत निवड चाचणी होईल.
१६ वर्षांखालील मुलांसाठी १६ एप्रिल रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत तसेच १४ वर्षांखालील मुलांसाठी १७ एप्रिल रोजी दुपारी १.३० ते ६ यावेळेत निवड चाचणी होणार आहे. होईल. १२ वर्षांखालील मुलांसाठी २१ एप्रिल रोजी आणि मुलींच्या १५ ते १९ वर्षे गटासाठी २२ एप्रिल रोजी दुपारी १.३० ते ६ वाजेपर्यंत निवड चाचणी पार पडेल.