डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'पीएमपीएमएल'च्या बसमार्गांमध्ये १३ व १४ एप्रिलला बदल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'पीएमपीएमएल'च्या बसमार्गांमध्ये १३ व १४ एप्रिलला बदल
पिंपरी, ता. ११ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी मिरवणूका निघतात. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी पिंपरी चौक, पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये नागरीकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 'पीएमपीएमएल'च्या काही बसमार्गांमध्ये १३ व १४ एप्रिलला बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, 'पीएमपी'च्या बस पर्यायी मार्गाने वळवल्या जाणार आहेत. 'पीएमपी'च्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन 'पीएमपी'कडून करण्यात आले आहे. बस मार्गांतील हे बदल १३ एप्रिलला सायंकाळी ४ वाजल्यापासून १४ एप्रिलला रात्री १२ पर्यंत लागू असतील.
तपशील पुढीलप्रमाणे -
- दांडेकर पूल परिसरातून होणाऱ्या बस संचलनातील बदलाबाबत
दिनांक १३/०४/२०२६ रोजी दुपारी ०४.०० वाजलेपासून दिनांक १४/०४/२०२६ रोजी रात्रौ १२.०० वाजेपर्यंत दांडेकर पुल परिसरातून संचलनात असलेल्या बसमार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
बसमार्ग क्रमांक १२, ४२ व २९९ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता सणस पुतळा, निलायम टॉकीज, मांगीर बाबा चौक, लोकमान्य नगर च्या पुढे नियोजित मार्गाने बसेस संचलनात राहतील.
बसमार्ग क्रमांक १५, १७, ४७,५०,५२, ५२अ ९७, ११७, ११८ व ११८अ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता सारसबाग, सणस पुतळा, निलायम टॉकीज, मांगीर बाबा चौक, सेनादत्त पोलीस चौकी, राजेंद्रनगर बालशिवाजी चौक, म्हसोबा चौक दत्तवाडी, गणेशमळा च्या पुढे नियोजित मार्गाने बसेस संचलनात राहतील.
- पुणे स्टेशन परिसरातून होणाऱ्या बस संचलनातील बदलाबाबत
पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने दिनांक १४/०४/२०२६ रोजी रात्रौ १२.०० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड व मोलेदिना बस स्थानक येथून सुटणाऱ्या बसेस पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) येथून सुटतील व परतीच्या वेळी बंडगार्डन कडून येताना वाडीया कॉलेज, अलंकार चौक व पेटीट बस स्थानक (पुणे स्टेशन आगार) अशा संचलनात राहतील.
- वडगांव शेरी व खराडी परिसरातून होणाऱ्या बस संचलनातील बदलाबाबत
दिनांक १४/०४/२०२६ रोजी दुपारी ४.०० वाजलेपासून रात्रौ १२.०० वाजेपर्यंत वडगांव शेरी व खराडी परिसरातून संचलनात असलेल्या बसमार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
> बसमार्ग क्रमांक १६५ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता वडगांव शेरी गावठाण कडे जाताना रस्ता बंद झाल्यास सदर मार्गाच्या बसेस मॅचवेल कंपनी पर्यंत संचलनात राहतील.
> बसमार्ग क्रमांक १५३, २३४ व २३५ या मार्गावरील सर्व बसेस खराडी गावाकडे जाता-येता टाटा गार्ड रूम कडे न जाता सरळ पुढे नगर रोडने चंदननगर बायपास येथून उजवीकडे वळून दुर्गा माता मंदिर, रेडिसन हॉटेल व पुढे नियोजित मार्गाने बसेस संचलनात राहतील.
- पिंपरी चौक परिसरातून होणाऱ्या बस संचलनातील बदलाबाबत
दिनांक १३/०४/२०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजलेपासून दिनांक १४/०४/२०२६ रोजी रात्रौ ०२.०० वाजेपर्यंत पिंपरी चौक परिसरातून संचलनात असलेल्या बसमार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
> बसमार्ग क्रमांक ४२,१२२, १२३, १३९, १३९अ, २८१, २६२, ३१७, ३३६, ३३७ व ३६६ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता डेअरी फार्म ग्रेड सेप्रेटर मधून संचलनात राहतील.
> बसमार्ग क्रमांक ३३१, ३३१अ ३३१व, ३४४, ३४४अ, ३८० व मेट्रो शटल ३२ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता एच.ए. कॉर्नर, रसरंग चौक, अॅटोक्लस्टर मदर तेरेसा पुलावरून विजयनगर, एम. एम. स्कूल व पुढे नियोजित मार्गाने संचलनात राहतील.
बसमार्ग क्रमांक ३०२, ३५६ व बी१ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता एच.ए. कॉर्नर, रसरंग चौक, अँटोक्लस्टर मदर तेरेसा पुलावरून विजयनगर व पुढे डावीकडे वळून लकी बेकरी पासून डावीकडे वळून पिंपरीगांव अशा संचलनात राहतील.
बसमार्ग क्रमांक ३३४ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता के.एस.बी. चौक, अॅटोक्लस्टर मदर तेरेसा पुलावरून विजयनगर व पुढे डावीकडे वळून लकी बेकरी पासून डावीकडे वळून पिंपरीगांव अशा संचलनात राहतील.
बसमार्ग क्रमांक ३१२ या मार्गावरील सर्व बसेस जाता-येता एच.ए. कॉर्नर, रसरंग चौक, के.एस.बी. चौकाच्या अलीकडे डावीकडे वळून मोहननगर, चिंचवड स्टेशन व पुढे चिंचवडगांव अशा संचलनात राहतील.