news
clock
दुरुस्तीच्या कामासाठी डेक्कन परिसरातील झेड ब्रीज दुरुस्तीसाठी एक महिना बंद राहणार

दुरुस्तीच्या कामासाठी डेक्कन परिसरातील झेड ब्रीज दुरुस्तीसाठी एक महिना बंद राहणार

 दुरुस्तीच्या कामासाठी डेक्कन परिसरातील झेड ब्रीज दुरुस्तीसाठी एक महिना बंद राहणार

पिंपरी, ता. ११ - पुण्यातील डेक्कन परिसरातील झेड ब्रीज (स्वर्गीय काकासाहेब गाडगीळ पूल) दुरुस्तीच्या कामासाठी एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (ता. १०)  पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवात झाली आहे. हे काम ९ मे पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे १ महिना नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी जिंतेंद्र डुडी यांनी सांगितले आहे. 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार, गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व उड्डाणपुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात आले होते. या ऑडीटमध्ये  एकूण १७ पुलांना तातडीने दुरुस्तीची गरज असल्याचे समोर आले. या कामाच्या पहिल्या टप्प्यात खडकवासला, संभाजी आणि दांडेकर पुलांचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 'झेड ब्रीज'ची दुरुस्ती केली जाणार आहे. 

पुलावरील विस्तार सांधे (एक्सपेंशन जॉइंट्स) आणि बेअरिंग्ज बदलण्याचे काम अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रात्री ११ वाजता ते सकाळी ७ वाजेपर्यंतचा कालावधी निवडण्यात आला आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुलाच्या सुरक्षिततेसाठी दुरुस्तीचे काम महत्त्वाचे आहे, असे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले.  पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर तो पूर्ववत सुरु होणार आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories