news
clock
'हाय रिस्क' गर्भवतींसाठी 'अनॉमली स्कॅन' तपासणी अनिवार्य, बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाचा निर्णय

'हाय रिस्क' गर्भवतींसाठी 'अनॉमली स्कॅन' तपासणी अनिवार्य, बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाचा निर्णय

'हाय रिस्क' गर्भवतींसाठी 'अनॉमली स्कॅन' तपासणी अनिवार्य, बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाचा निर्णय

पिंपरी, ता. २३ -  राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने हाय रिस्क गर्भवतींसाठी 'अनॉमली स्कॅन' ही तपासणी आता अनिवार्य केली आहे. त्याबाबतचे आदेश शासकीय व खासगी रुग्णालये तसेच सोनोग्राफी सेंटर्स यांना देण्यात आले आहेत. या तपासणीद्वारे गर्भातील विकृतींचे वेळीच निदान करुन आवश्यक वैद्यकीय उपाययोजना केल्या जाणार आहेत.  जन्मजात विकृतींमुळे होणारे बालमृत्यू रोखता येणार आहेत. 

बालमृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेले तीन वर्षे बालमृत्यूंचा अभ्यास केला असता, एकूण मृत्यूंपैकी ५ ते ६ टक्के मृत्यू हे जन्मजात व्यंग बालके जन्माला आल्याने होतोय. अशी बालके जन्माला येऊ न देता, त्यांचा वेळीच वैद्यकीय गर्भपात करुन बालमृत्यूला आळा घालण्याचा या तपासणीचा उद्देश त्यामागे आहे. 'अनॉमली स्कॅन' ही एक प्रकारची सोनोग्राफी तपासणी असून, त्याद्वारे गर्भातील विकृती ओळखता येतात. 

ही तपासणी गरोदरपणात आठवड्याच्या १८ ते २० आठवड्यांच्या कालावधीत करण्यात येते. सन २०२४-२५ पासून शासकीय रुग्णालयांत दुसऱ्या तिमाहीत (सेकंड ट्रायमेस्टर) 'अनॉमली स्कॅन'ची सुविधा मोफत उपलब्ध आहे. मात्र, खासगीमध्ये ही तपासणी सशुल्क आहे. सरकारने याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे.

हाय रिस्क गर्भवतींमध्ये यांचा समावेश होतो....

१) वय १८ वर्षाखाली किंवा ३५ वर्षांपेक्षा जास्त

२) मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड, अपस्मार, स्थूलता (बीएमआय ३० पेक्षा जास्त)

३) आयव्हीएफद्वारे गर्भधारणा

४) डाउन सिंड्रोम/इतर गुणसूत्रीय विकृतीचा धोका

५) पूर्वी गर्भपात, मृतजन्म किंवा जन्मजात विकृतीचा इतिहास

६) जवळच्या नात्यातील विवाह

७) मद्यपान, धूम्रपान, औषधे/कीटकनाशकांचा संपर्क

८) गर्भावस्थेदरम्यान 'टॉर्च' संसर्ग (रुबेला, सीएमव्ही, हर्पिस इ.)

९) फॉलिक अॅसिडची कमतरता, तीव्र रक्तक्षय किंवा कुपोषण


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories