news
clock
राज्य औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर

राज्य औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर

राज्य औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर

पिंपरी, ता. २४ - राज्य औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना  हक्काचे घर आता मिळाले आहे.  राज्याचे उद्योगमंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या गृहप्रकल्पाचे शुक्रवारी (ता. २२) उद्घाटन झाले. तब्बल २६५ सभासदांना स्वतःच्या घराची किल्ली मिळाली. बिजलीनगर येथील साईदत्त सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून हा विशेष गृहप्रकल्प पूर्णत्वास गेला.

याप्रसंगी मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, बाळासाहेब झांजे, अधीक्षक अभियंता नीलेश मोंढवे, राहुल तिडके, कार्यकारी अभियंता विनायक खांदवे, संजय कितवाड, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक विश्वजीत बारणे, नीलेश तरस, राजेंद्र गावडे, साईदत्त सोसायटीचे अध्यक्ष शैलेंद्र परदेशी, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, डॉ. अर्चना पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्मचारी वसाहतीसाठी चिंचवड येथे जागा मिळावी या उद्देशाने संस्थेने सन २०१० मध्ये एमआयडीसीकडे अर्ज केला होता. जागा मंजूर झाल्यानंतर  शैलेंद्र परदेशी यांची सर्वानुमते प्रवर्तक म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर २५ महिन्यांत सहा भव्य इमारती उभारून बांधकाम पूर्ण करण्यात आले. याविषयी बोलताना, शैलेंद्र परदेशी म्हणाले, ''सदर गृहनिर्माण संस्था केवळ निवासस्थानांची उभारणी नाही तर  औद्योगिक क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि सुसंस्कृत निवासव्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories