अंमली पदार्थविरोधी Reel-Poster स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रवेशिकांची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत वाढली

अंमली पदार्थविरोधी Reel-Poster स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रवेशिकांची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत वाढली

पिंपरी-चिंचवड | 1 सप्टेंबर 2026 : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या अंमली पदार्थविरोधी Poster, Instagram Reel आणि Short Video स्पर्धेला शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग आणि उत्साह लक्षात घेऊन स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 7 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून मागील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘Virtual Townhall on Anti-Drug Awareness’ कार्यक्रमात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती. युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करणे, हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

स्पर्धेत सहभागी कसे व्हाल?

विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती करणारे Poster, Instagram Reel किंवा Short Video तयार करावे. तयार केलेली कलाकृती Instagram वर पोस्ट करून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अधिकृत @pcpcitypolice हँडलला टॅग करणे आवश्यक आहे. एक विद्यार्थी एकापेक्षा अधिक Instagram Reels किंवा Short Videos सादर करू शकतो.

स्पर्धेसाठी विषय

स्पर्धेतील पहिला आणि विशेष प्राधान्याचा विषय ‘Speak Up, Report Confidentially’ हा आहे. अंमली पदार्थांबाबतची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या Anti-Narcotics Helpline – 77 98 100 112 या क्रमांकावर गोपनीयपणे कशी देता येईल, याबाबत जनजागृती करणारी कलाकृती विद्यार्थ्यांना तयार करता येणार आहे.

याशिवाय, अंमली पदार्थविरोधी जनजागृती करणाऱ्या अन्य कोणत्याही नावीन्यपूर्ण संदेशावर प्रवेशिका सादर करता येईल.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 3 प्रवेशिकांच्या विजेत्यांचा तसेच त्यांच्या संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा पोलीस आयुक्तालय स्तरावरील विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी आणि युवकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अंमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories