आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी ८ व ९ जुलैला शहरातील पालखी मार्गावरील वाहतूकीत बदल
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - आषाढी वारी पालखी (दिंडी) सोहळा दिनांक ७ जुलै २०२६ पासून सुरु होणार आहे. जगत्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी देहूतील इनामदार वाड्यातून आकुर्डी येथील विठ्ठल मंदीरात ८ जुलैला मुक्कामासाठी येणार आहे आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज याची पालखी गांधीवाडा आळंदी येथे मुक्कामी असणार आहे. यानंतर, दोन्ही पालख्या ९ जुलैला पुण्याकडे प्रस्थान करतील. त्यामुळे पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी असणार आहे. यावेळी, इतर वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी व पालखी सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पालखी मार्गावरील इतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत.
वाहतुकीतील हे बदल अत्यावश्यक सेवेतील वाहने व दिंडीतील वाहनांखेरीज (उदा. फायरब्रिगेड, पोलिस वाहने, दिंडीतील वाहने रुग्णवाहिका इ.) करुन सर्व वाहनांकरीता आवश्यकतेनुसार लागू करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक/नागरिकांनी प्रवासासाठी सार्वजनिक वाहन व्यवस्था/दुचाकी वाहनांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेमार्फत करण्यात येत आहे.
- Dehu, Alandi, Akurdi, Vitthal Temple Akurdi, Pune, Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Traffic Police, Traffic Diversion, Traffic Advisory, Alternate Routes, Road Closure
- Ashadhi Wari, Ashadhi Wari 2026, Palkhi Sohala, Dindi, Sant Tukaram Maharaj Palkhi, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
- वाहतूक बदल, वाहतूक वळविणे, पर्यायी मार्ग, ट्रॅफिक डायव्हर्जन, वाहतूक नियोजन
- देहू, आळंदी, आकुर्डी, विठ्ठल मंदिर आकुर्डी, पुणे, पिंपरी चिंचवड
- आषाढी वारी २०२६, पालखी सोहळा, दिंडी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी