आषाढी वारीसाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान
आषाढी वारीसाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान
पिंपरी, ता. २७ - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त माऊलींच्या पालखीच्या मानाच्या अश्वांचे प्रस्थान आज (ता. २७) अंकली (बेळगाव) येथून भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान झाले. यावेळी उपस्थित भाविकांनी पुष्पांचा वर्षाव करून मानाच्या अश्वांना आषाढी वारीतील वाटचालीसाठी निरोप दिला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्ताने श्री माऊलींच्या अश्वांचे सरदार शितोळे वाडा (अंकली, बेळगाव) येथे उर्जित सिंह शितोळे सरकार आणि महादजी राजे शितोळे सरकार यांनी परंपरेनुसार विधिवत मानाचा ध्वज आणि मानाच्या अश्वांचे पूजन केले. त्यानंतर राजवाडा आणि नगरप्रदक्षिणा करून माऊलींचे अश्व आळंदीच्या दिशेने माऊलींच्या जयघोषात, हरिनाम गजरात प्रस्थान केले.
या मंगल प्रसंगी ग्रामस्थ, सेवेकरी, मानकरी व वारकरी उपस्थित होते. सर्वत्र माऊलींचा नि विठुरायाच्या नामघोष ऐकू येत होता. आठ जुलै रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. सात जुलैला मानाचे अश्व आळंदीत पोहोचणार आहेत. मानाच्या अश्वांचे 27 जूनला अंकली येथून प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम मिरज, 28 जूनला सांगलवाडी राम मंदिर, 29 जूनला ईश्वरपूर पेठनाका, 30 जूनला वाठारगाव, 1 जुलै रोजी भरतगाव, 2 जुलै रोजी भुईंज, 3 जुलै रोजी सारोळा, 4 जुलै रोजी शिंदेवाडी, 5 व 6 जुलै रोजी पुणे येथे असेल.
- मानाचे अश्व, Honored horses, अश्व प्रस्थान, Horse procession departure, अंकली, Ankali, बेळगाव, Belgaum, आळंदी, Alandi, वारकरी संप्रदाय, Warkari sect, पालखी सोहळा, Palkhi procession
- आषाढी वारी, Ashadhi Wari, संत ज्ञानेश्वर माऊली, Sant Dnyaneshwar Mauli, ज्ञानेश्वर महाराज पालखी, Dnyaneshwar Maharaj Palkhi