पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी खासदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, महिला कॉंग्रेसची मागणी

पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी खासदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, महिला कॉंग्रेसची मागणी

पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी खासदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, महिला कॉंग्रेसची मागणी 

पिंपरी, ता. २७ - लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संवाद साधणारे आणि त्यांना उघडपणे धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.

त्यावेळी माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस अॅड. उमेश खंदारे, प्रियंका सगट, राहुल शिंपले, स्वाती शिंदे, आशा भोसले, अॅड. प्रियंका ढगे, प्रज्ञा जगताप व महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत अर्वाच्य, अश्लील भाषा वापरली. केवळ शिवीगाळच नव्हे, तर पत्रकारांना मारून पाठवेन, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. या घटनेमुळे पत्रकार आणि सुजाण नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणारी व्यक्ती जेव्हा भररस्त्यात पत्रकारांना शिवीगाळ करते आणि जीवे मारण्याची धमकी देते, तेव्हा ही लोकशाहीची थट्टा आहे. लोक प्रतिनिधीकडून अशा अशोभनीय वर्तनाची अपेक्षा नसते, अशा प्रवृत्तीला पायबंद घातला पाहिजे.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories