भोंदू अशोक खरातविरुद्ध आत्तापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल
पुणे, ता. २८ - भोंदू अशोक खरातची एसआयटी चौकशी सुरु आहे, त्याची काळी कृत्ये दररोज समोर येत आहेत. आतापर्यंत खरातविरोधात एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खरातने आतापर्यंत १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.
वाईट कृत्ये कोणालाही कळू नये यासाठी त्याने कार्यालयाच्या ठिकाणी कोड वर्डची रचना केली होती. ही कोड वर्डची रचना त्याच्या कर्मचाऱ्यांना देखील माहिती होती. एखाद्या महिलेला शुद्धीकरणासाठी आपल्या केबिनमध्ये बोलावल्यानंतर केबिनमधील झुंबराचा दिवा बंद करुन त्याच्या केबिनमध्ये महिलांचे लैगिक शोषण करायचा. अत्याचाराआधी तो केबिनच्या बाहेर असलेल्या झुंबराचा दिवा बंद करायचा. झुंबराचा दिवा बंद असेपर्यंत खरातच्या केबिनमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नसे. खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या कोडवर्डची माहिती असल्याने ते देखील आत प्रवेश करायचे नाहीत.
व्यवसायातील अडथळे दूर करुन देण्यासाठी 'अवतार पूजा' या शब्दाचा सांकेतिक भाषेत वापर करुन त्याने अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याशिवाय, तो 'भक्तांना जादुई तुर्की मध प्रति किलोग्राम १५ लाख रुपयांना विकायचा', अशी माहिती तपासात समोर आली आहे.