news
clock
खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा

पिंपरी, ता. २८ - भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षातही त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे, पक्षनेत्यांनीही चाकणकरांवर कारवाईचे संकेत दिले होते. शुक्रवारी (ता. २७) चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

राष्ट्रवादी  महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री,

मा. उपमुख्यमंत्री, मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories