चऱ्होली बुद्रुकमध्ये सोसायटीच्या मिटींगमध्ये मारहाण

चऱ्होली बुद्रुकमध्ये सोसायटीच्या मिटींगमध्ये मारहाण

चऱ्होली बुद्रुकमध्ये सोसायटीच्या मिटींगमध्ये मारहाण 

पिंपरी, ता. १८ - चऱ्होली बुद्रुक येथील तनिष पार्क सहकारी गृहरचना संस्थेत  विशेष सभेत सदस्यांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शनिवारी (ता. १६) घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एच विंगचा रहिवासी गणेश बाबूराव साने (वय ४२) याने मागील तक्रारीवरून फिर्यादी बाळासाहेब पोपटराव ओडगे (वय ५८) यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लिफ्टमध्ये फिर्यादीच्या मागे येऊन ओडगे यांच्या डोक्यात व पाठीवर कुठल्यातरी शस्त्राने वार केला. हल्ल्यात ओडगे जखमी झाले. आरोपीने त्यांना  शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देखील दिली

या प्रकरणी आरोपी गणेश साने यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात दिघी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५२ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories