दुकानासमोर गाडी पार्क करु नका......असे सांगितल्याने दुकानदाराला मारहाण, आळंदी-केळगाव येथील घटना

दुकानासमोर गाडी पार्क करु नका......असे सांगितल्याने दुकानदाराला मारहाण, आळंदी-केळगाव येथील घटना

 दुकानासमोर गाडी पार्क करु नका......असे सांगितल्याने दुकानदाराला मारहाण, आळंदी-केळगाव येथील घटना

पिंपरी, ता. १८ - दुकानासमोर गाडी पार्क करु नका....असे दुकानदाराने सांगितल्यावर २ गाडीतल्या ९ इसमांनी त्या दुकानदाराला शिवीगाळ करुन मारहाण केली. यात दुकानदार जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. १७) आळंदी-केळगाव (ता. खेड) येथील गुरुकृपा प्रोव्हीजन स्टोअर्स येथे घडली. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत, दुकानदार सोमनाथ हनुमंत मुंगसे (वय ४८) यांनी  तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ त्याचे गुरुकृपा प्रोव्हीजन स्टोअर्स हे किराणा दुकान सुरु करीत असताना त्यांच्या दुकानासमोर दोन चारचाकी वाहने  उभी करण्यात आली. त्यावेळी सोमनाथ यांनी त्या वाहनातील इसमांना येथे गाडी पार्क करण्याची जागा नाही असे सांगितले असता, त्यावेळी गाडीत बसलेल्या आरोपींनी गाडीतून खाली उतरुन सोमनाथ यांना अरेतुरे बोलून शिवीगाळ केली. हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का असे उद्धटपणे बोलून हाताने मारहाण केली. सोमनाथला सोडवण्यासाठी आलेला त्यांचा भाऊ अजय मुंगसे यास त्यातील एका इसमाने पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या पाईपने डोक्यावर व चेह-यावर मारले त्यावेळी त्याचे डोक्यातून रक्त येत होते. सागर धर्माधिकारी व गणेश अशोक माहरे यांच्या पायावर दगड फेकून मारून जखमी केले. 

पोलिसांनी या ९ आरोपींना अटक केली आहे. आरोपींची नावे अक्षय श्रीरंग भोसले (वय २३), विकास शांताराम पवार (वय २५), उमेश भीमराव जाधव (वय २५), सुरज नरेश पवार (वय २१), सिध्देश लक्ष्मण चोरगे (वय २०), जीवन शिवाजी पवार (वय २४), नरेष कोडीबा पवार (वय ५५), शांताराम कोडीबा पवार (वय ५७) आणि प्रकाश शांताराम पवार (वय २९) अशी आहेत. आरोपींवर आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ११८(१), १८९(२), १९०, ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories