कौटुंबिक वादातून नातेवाईकाच्या घराला लावली आग, सुदुंबरे येथील घटना

कौटुंबिक वादातून नातेवाईकाच्या घराला लावली आग, सुदुंबरे येथील घटना

कौटुंबिक वादातून नातेवाईकाच्या घराला लावली आग, सुदुंबरे येथील घटना 

पिंपरी, ता. ८ - कौटुंबिक वादातून एकाने नातेवाईकाच्या घराच्या दारावर पेट्रोल टाकून घराला आग लावून नातेवाईकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना  रविवारी (ता. ७) मावळ तालुक्यात सुदुंबरे येथे घडली आहे. 

याबाबत संदीप अनंता गाडे वय (४१ वर्षे,  व्यवसाय. रा सदुंबरे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा नातेवाईक आरोपी  गणेश अनंता गाडे (वय ४२ वर्षे, रा. म्हाळुंगे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे

फिर्यादी व आरोपी यांच्यात वडगांव न्यायालयात  सुरु असलेल्या दिवाणी दाव्याच्या कारणावरुन ७ जूनला रात्री ३.३० च्या सुमारास आरोपीने फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून घराला आग लावली. हे लक्षात आल्यावर फिर्यादी स्वयंपाकघराची खिडकी तोडून बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, या आगीत फिर्यादी संदीप गाडे यांच्या घराचा मुख्य दरवाजा, सोफासेट व लाकडी कपाट, घरातील संपूर्ण वायरींग जळून ५०,०००/- रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीवर तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३२६(g), ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories