पिरंगुट येथून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ जप्त

पिरंगुट येथून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ जप्त

पिरंगुट येथून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ जप्त 

पिंपरी, ता. ८ - बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांत दोन ठिकाणी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. त्यांचा तपशील असा.....

ठिकाणी पहिले - बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगलेला १२ हजार ३१२ रुपयांचे प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बावधन पोलिसांनी पिरंगुट परिसरातून शनिवारी (ता. ६) जप्त केले आहेत.  याबाबत, पोलिस शिपाई अमर अजिनाथ राणे (नेमणुक गुन्हे शाखा, युनिट-२) यांनी तक्रार दिली. आरोपी विजय उत्तम रणदिवे (वय ४३ वर्षे, रा. स्वप्नपुर्ती बिल्डींग, लक्ष्मी रोड, पिरंगुट, ता. मुळशी) याने एकुण १२,३१२/- रुपयांचा शरिरास अपायकारक असणारा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी सुपारी (गुटखा) हा माल बेकायदेशिरपणे विक्रीकरीता बाळगला होता. हा माल  पुना ट्रेडर्स, लक्ष्मी नगर, पिरंगुट या दुकानातील नारु नावाच्या इसमाकडून आणल्याचे सांगितले. आरोपी हा मूळचा धाराशिव येथील आहे. 

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवनाने मुखांचे कर्करोग व इतर विकार होऊन शारिरीक हानी होऊ शकते हे माहित असतानाही आरोपीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरु ठेवली होती. आरोपीवर बावधन पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १२३, २७१, २७२, २७४, २७५, २२३ नुसार गुन्हा नोंदवला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

ठिकाण दुसरे -  बावधन पोलिसांनी सोमवारी (ता. ७) संध्याकाळी ७ वाजता पिरंगुट येथील राऊत पान शॉपवर छापा टाकून गुटखा व सुगंधी सुपारीच्या बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी भरत दगडू राऊत (वय २८ वर्षे) याच्या दुकानातून एकूण १, ८५३ रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपीला हे पदार्थ शारीरिक हानी होऊ शकते हे माहित असूनही बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवले होते.

याबाबत, पोलिस शिपाई अमोल आत्माराम बुरटे (नेमणुक बावधन पोलिस स्टेशन) यांनी फिर्याद दिली.  हे तंबाखूजन्य पदार्थ पिरंगुट येथील पुना ट्रेडर्समधून आणल्याची माहिती आरोपीने दिली. आरोपीवर भा.न्या.सं. कलम १२३, २७१, २७२, २७४, २७५, २२३, ३(५)  अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories