भांडणाच्या रागातून युवकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
पिंपरी, ता. १६ - जुन्या व ताज्या भांडणाच्या रागातून दोन युवकांनी एका २२ वर्षीय युवकाला गाठून लोखंडी रॉडने मारहाण केलील व लोखंडी बॅरिकेट त्याच्या अंगावर फेकले. ही घटना शुक्रवारी (ता. १५) औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर कावेरीनगर सब-वेच्या खाली दुपारी २ वाजता घडली आहे.
मारहाण झालेला युवक निकेश बंडु क्षिरसागर (वय-२२ वर्षे, रा. पवारनगर, थेरगाव) याने तक्रार दिली आहे. किरण दिपक विटकर (वय २५ वर्षे) व चेतन दिपक विटकर (वय २७ वर्षे) दोघे रा. वाकड यांनी निकेशला मारहाण केली. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींनी फिर्यादी निकेशच्या भावासोबत वर्चस्वाच्या कारणावरन पुर्वी झालेल्या भांडणाचा व शुक्रवारी झालेल्या वादाचा राग मनात धरुन निकेशला मारहाण केली. निकेश घरी पायी चालत जात असतांना कावेरीनगर सबवेच्या खाली फिर्यादीस गाठले. एकाने निकेशच्या अंगावर मोटार सायकल घालून त्याला खाली पाडले. दुसऱ्याने निकेशला ''तु लई मध्ये मध्ये करतो, तुला आज आम्ही खलासच करतो. '', असे म्हणून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉड डोक्यात घातला. जवळच पडलेले बॅरिकेट उचलून फिर्यादीच्या अंगावर टाकले. दोघांनीही निकेशच्या तोंडावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात निकेश गंभीर जखमी झाला आहे.
- आरोपी, accused, अटक, arrest, वर्चस्व वाद, rivalry dispute, जुनं भांडण, old dispute, गंभीर जखमी, seriously injured,
- , पिंपरी-चिंचवड, Pimpri-Chinchwad, थेरगाव, Thergaon, वाकड, Wakad, निकेश क्षिरसागर, Nikhesh Kshirsagar,
- औंध-रावेत बीआरटी रोड, Aundh-Ravet BRT Road, कावेरीनगर सबवे, Kaverinagar subway,
- भांडण, fight, मारहाण, assault, लोखंडी रॉड, iron rod, बॅरिकेट, barricade, जीवघेणा हल्ला, deadly attack,