राज्यस्तरिय  स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेत बारामती बसस्थानकाने पटकवला प्रथम क्रमांक

राज्यस्तरिय स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेत बारामती बसस्थानकाने पटकवला प्रथम क्रमांक

राज्यस्तरिय  स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेत बारामती बसस्थानकाने पटकवला प्रथम क्रमांक 

पुणे, ता. ३० -  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि महाराष्ट्र शासन परिवहन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेत बारामती बसस्थानकाने 'अ' वर्ग प्रवर्गात राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करुन राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. सोमवारी (ता. १) मुंबईत होणा-या कार्यक्रमात हे प्रथम क्रमांकाचे १ कोटी रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती बस स्थानक हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्यांनी तो दोन वर्षात साकारला होता.  

या स्पर्धेमध्ये राज्यातील 568 बसस्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येकी शंभर गुणांच्या चार सर्वेक्षणामध्ये बारामतीला चारशेपैकी 386 गुण प्राप्त झाले. बारामती बस स्थानकाची उभारणी विमानतळाच्या धर्तीवर केलेली आहे. तिथे प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा आहेत. सुमारे 50 कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक उभारण्यात आले आहे. रात्री दिव्यांच्या प्रकाशात हे बसस्थानक उजळून निघते. राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त करणा-या बारामती बसस्थानकाने पुणे प्रादेशिक विभागातही प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.

बारामती बस स्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती बस स्थानकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी खासदार पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आधी उपस्थित होते.

बारामती बसस्थानक हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेत अवघ्या दोन वर्षात बारामतीचे बसस्थानक प्रत्यक्षात उतरवून दाखविण्याची किमया त्यांनी साकारली होती. पहिली वीट रचण्यापासून ते उदघाटनापर्यंत अजित पवार यांनी एकहाती या बसस्थानकाची उभारणी केली होती. बारामतीला राज्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर बसस्थानकाचा किताब मिळालेला पाहण्यासाठी आज अजितदादा हवे होते, अशी भावुक प्रतिक्रीया अनेक नेटक-यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त करत मिस यू दादाच्या पोस्ट टाकल्या.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories