news
clock
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीतून कॉंग्रेसची माघार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय दृष्टीपथात

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीतून कॉंग्रेसची माघार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय दृष्टीपथात

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीतून कॉंग्रेसची माघार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय दृष्टीपथात

पुणे, ता. १० - बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.  सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे  काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवार दिल्याने ही लढत स्पर्धात्मक होणार होती. पण, महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कॉंग्रेसला विनंती केली आणि महायुतीच्या नेत्यांची विनंती कॉंग्रेसने मान्य केली. आता एकूण २३ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे स्वतः सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेचच्या नेत्यांशी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा व विनंती केली होती. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना माघार घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कॉंग्रेसने आपली उमेदवारी मागे घेतली आहे. 

याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत. आज दोन पावले माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे.''

बारामती  विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा गुरुवारी (ता.९) शेवटचा दिवस होता. एकूण ३० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.  त्यामुळे आता एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवतील.  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, लोकसभेची निवडणूक लढवणारे अभिजित बिचकुले,  न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रा. आर. वाय. घटूगडे, हिंदुस्तान जनता पार्टीचे सतीश कृष्णा कदम हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. अपक्ष लढणाऱ्या  उमेदवारांमध्ये अॅड. अविनाश गायकवाड, गजानन पाटील, चंद्रकांत मोटे, चंद्रकांत वाघमोडे, दत्तात्रय बेदरे, बाळासो धापटे, मिथुन आटोळे, मंगलदास निकाळजे, योगेश उल्हासनगरकर, रोहित भोसले, डॉ. विजयकुमार भिसे, विराज शिंदे, शिवाजी कोकरे, सतीश सोनवणे, सागर भिसे, साजन आडसुळ, सीताराम रणदिवे आणि सोनाली राणे हे यांचा समावेश आहे.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories