महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने मतदारांपर्यंत पोहोचावे - रवींद्र चव्हाण

पुणे, ता. १४ - बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधील महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने बूथस्तरावर काम करावे, केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांच्या बळावर मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बारामती विधानसभा क्षेत्रातील भाजपचा मेळावा सोमवारी (ता.१३) बारामतीमध्ये पार पडला.

या निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे नवे पर्व सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पायाभूत सुविधा, शेती, रोजगार व सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. या विकासाच्या बळावर महायुती बारामतीत निश्चित विजय मिळवेल.''

यावेळी प्रदेश महासचिव राजेश पांडे, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष शेखर वडणे, नवनाथ पडळकर, पांडुरंग कचरे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांनी प्रास्ताविक केले. आमदार राहुल कुल, नवनाथ पडळकर, सतीश फाळके, दिलीप खैरे व अॅड. गोविंद देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. नितीन भामे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories