news
clock
नवीन शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी चौथीसाठी नवा अभ्यासक्रम, 'मे'मध्ये शिक्षकांना प्रशिक्षण

नवीन शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी चौथीसाठी नवा अभ्यासक्रम, 'मे'मध्ये शिक्षकांना प्रशिक्षण

नवीन शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी चौथीसाठी नवा अभ्यासक्रम, 'मे'मध्ये शिक्षकांना प्रशिक्षण  

पुणे, ता. १४ - सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षकांना अध्यापन प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी बंधनकारक आहे. प्रशिक्षणाची सुरवात ४ मे पासून होणार आहे. याबाबतच्या सूचना  परिषदेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. 

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरु होणार आहे. त्याआधी शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे परिषदेचे आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर हे प्रशिक्षण तीन टप्प्यात पार पडणार आहे.  राज्यस्तरावर ४ ते ७ मे दरम्यान मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण होईल. जिल्हास्तरावर ११ ते १४ मे दरम्यान मराठी व अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि तालुका स्तरावर १८ ते ३० मे दरम्यान प्रशिक्षण होणार आहे. उर्दू माध्यमासाठी प्रशिक्षण केवळ राज्य व जिल्हा या दोन स्तरांपुरते मर्यादित असेल. 

राज्यस्तरावरील प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांची अपेक्षित संख्या निश्चित केली आहे. या तज्ज्ञांचा पुढील टप्प्यांतील प्रशिक्षणासाठी उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी मार्गदर्शकांची नावे २० एप्रिलपर्यंत सादर करायची आहेत. खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांसाठी शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येणार आहे. मात्र, त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही. प्रशिक्षणामध्ये इयत्ता सहावीचा समावेश केलेला नाही. त्याबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

थोडक्यात...

इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुरु होण्याचा दिनांक - ४ मे

शैक्षणिक वर्ष सुरु होणार -  १५ जूनला

प्रशिक्षण टप्पे - राज्यस्तर : ४ ते ७ मे, जिल्हास्तर : ११ ते १४ मे, तालुकास्तर : १८ ते ३० मे

प्रशिक्षण माध्यम -  मराठी : सर्व स्तरांवर, उर्दू : राज्य व जिल्हा स्तर, इतर माध्यम : मराठीसोबत

प्रशिक्षक अपेक्षित संख्या -  इयत्ता दुसरी (मराठी) : १८३, इयत्ता तिसरी-चौथी (मराठी) : २६८, इयत्ता पहिली (उर्दू) : १३८,

                                       इयत्ता तिसरी-चौथी (उर्दू) : १८०




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories