बास्केटबॉल खेळताना अंगावर लोखंडी खांब पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, इंदोरी येथील घटना

बास्केटबॉल खेळताना अंगावर लोखंडी खांब पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, इंदोरी येथील घटना

बास्केटबॉल खेळताना अंगावर लोखंडी खांब पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, इंदोरी येथील घटना  

पिंपरी, ता. ६ - बास्केटबॉल खेळताना अंगावर लोखंडी खांब पडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ५) सकाळी सात वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तळेगाव-चाकण रस्त्यावरील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या आवारात घडली. विशाल वर्मा (वय २० वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट विद्यार्थी असून तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहात होता. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. विद्यार्थी रविवारी सकाळी तोलानी इन्स्टिट्यूटच्या आवारात बास्केटबॉल खेळत होते. 

विशाल बास्केटबॉल रिंगला लटकला असता रिंग तुटली आणि  लोखंडी खांब खाली पडला. लोखंडी खांब अंगावर पडल्याने विशाल गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला तत्काळ तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूने विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories