भामा-आसखेड ते पिंपरी-चिंचवड भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम नव्या कंपन्यांकडे

भामा-आसखेड ते पिंपरी-चिंचवड भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम नव्या कंपन्यांकडे

भामा-आसखेड ते पिंपरी-चिंचवड भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम नव्या कंपन्यांकडे 

पिंपरी, ता. ३० -  भामा-आसखेड धरणातून भूमिगत जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवड शहरात पाणी आणले जाणार आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या उर्वरित ३० टक्के कामासाठी महापालिकेने दोन नव्या ठेकेदारांची नियुक्ती केली आहे.  हे काम पुढील दहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला दरदिवशी ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 

सदर प्रकल्पाचे काम मुंबई येथील ऑफशोअर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला देण्यात आलो होते. मात्र, वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे  महापालिकेने संबंधित ठेकेदाराला बडतर्फ केले व नव्याने अल्पमुदतीची निविदा प्रक्रिया राबविली. आता, हे राहिलेले काम एस. एस. साठे इन्फ्रा प्रा. लि. व व्ही. एम. जावळे कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. 

भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकायची आहे. या कामासाठी ३३.३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि मुदत नऊ महिन्यांची आहे.  ब्रेक प्रेशर टाकीपासून तळवडे आणि देहूपर्यंत १,४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी ५२.२३ कोटी रुपये खर्च होणार आहे. या कामाची मुदत दहा महिने आहे. ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कामावर पाणीपुरवठा विभागाकडून नियमित देखरेख ठेवली जात आहे व  दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जात आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर प्रतिदिन ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी सांगितले. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories