फुगेवाडीत विषारी दारुमुळे मरण पावलेल्या प्रत्येक मयताच्या कुटुंबियांना महापालिकेकडून १ लाख रुपयांची मदत जाहीर
May 30 2026
55
फुगेवाडीत विषारी दारुमुळे मरण पावलेल्या प्रत्येक मयताच्या कुटुंबियांना महापालिकेकडून १ लाख रुपयांची मदत जाहीर
पिंपरी, ता. ३० - फुगेवाडीमध्ये विषारी दारुमुळे मृत्यू झालेल्या नागरीकांच्या कुटुंबियांची महापौर रवी लांडगे यांनी भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन करुन मयताच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत महापालिकेकडून दिली जाणार आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना महापौर लांडगे म्हणाले की, ''फुगेवाडीतील विषारी दारु प्यायल्याने मृत्यू झालेले नागरीक गरीब होते. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर संकट ओढावले आहे. या संकटातून सावरण्यासाठी या घटनेतील प्रत्येक मयताच्या कुटुंबास महापालिकेडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य शासनानेही त्यांना मदत जाहीर करावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. ''
''यापुढे शहरातील नागरीकांनी, महिलांनी त्यांच्या परिसरात अवैध दारुविक्री सुरु असेल तर महापालिका प्रशानासला कळवावे. त्यावर तत्काल कारवाई केली जाईल.'', असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
- Relief for Victims, Aid Announcement
- Financial Assistance, Mayor, Ravi Landge, Municipal Corporation,
- Toxic Liquor, Hooch Death, Citizens Death, Family Support,
- महापौर, महापालिका, रवी लांडगे, १ लाख रुपये मदत, सहायता, फुगेवाडी मृत्यू प्रकरण
- फुगेवाडी, विषारी दारू, मृत्यू, नागरीक मृत्यू, मयत कुटुंब, आर्थिक मदत,