भाटनगरमधून गावठी दारुचे २५ लिटर कच्चे रसायन जप्त
पिंपरी, ता. 2 - भाटनगर वसाहतीतून गावठी दारू तयार करण्याचे 25 लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी सोमवारी (ता.1) सायंकाळी करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस शिपाई समीर लक्ष्मण ढवळे, ,(पोलीस शिपाई ३६०९) त्यांनी तक्रार नोंदवली आहे.
आरोपी मनोज दिलावर बागडे (वय-५५ वर्ष, रा. बिल्डींग नं. ७ पहिला मजला भाटनगर पिंपरी) याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय सहिंता कलम १२३, महा. दारुबंदी अधि. कलम ६५ (क) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मनोज बागडे याने त्याच्या खोलीत एकूण २५ लिटर उग्र वासाचे गावठी दारु तयार करण्याचे रसायन (कच्चा माल मिश्रण) विक्रीसाठी बनवल्याचे आढळून आले. या कारवाईमध्ये या रसायनासह आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.