news
clock
ब्लिंकीट सुपर स्टोअरच्या आवारात वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, भोसरीतील घटना

ब्लिंकीट सुपर स्टोअरच्या आवारात वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, भोसरीतील घटना

ब्लिंकीट सुपर स्टोअरच्या आवारात वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, भोसरीतील घटना

पिंपरी, ता. ३० - भोसरीतील महादेवनगर परिसरातील ब्लिंकीट सुपर स्टोअरच्या आवारात ऑर्डरच्या कारणावरुन एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची शनिवारी (ता. २८) घटना घडली. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २९) गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे व तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता महादेव नगर येथील ब्लिंकीट सुपर स्टोअर परिसरात घडली. फिर्यादी उमेश गजानन आसणे (वय १७, व्यवसाय – डिलीव्हरी बॉय, रा. भोसरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कैलास दगडू फुलमाळी (१९) व त्याचे साथीदार यांनी संगनमताने हल्ला केला.

गेल्या पंधरा दिवसांपासून डिलीव्हरी ऑर्डरच्या कारणावरून सुरू असलेल्या वादातून आरोपी मोटारसायकल व स्कुटीवर येऊन फिर्यादीचा भाऊ गणेश गजानन आसणे याच्यावर कोयत्याने डोक्यावर, हातावर व इतर ठिकाणी वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी घटनास्थळी लोकांना आत जाण्यापासून रोखत हातातील कोयते दाखवून दहशत निर्माण केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार तसेच आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना क्रमांक  अटक करण्यात आली असून उर्वरित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories