news
clock
कौटुंबिक वादातून युवकाला मारहाण, भोसरीतील घटना

कौटुंबिक वादातून युवकाला मारहाण, भोसरीतील घटना

कौटुंबिक वादातून युवकाला मारहाण, भोसरीतील घटना  

पिंपरी, ता. २ -  महात्मा फुलेनगर-एमआयडीसी भोसरी परिसरात बुधवारी (ता. १) रात्री सुमारे ८:३० वाजता कौटुंबिक वादातून युवकाला मारहाण केल्याची घटना घडली. 

याबाबत, दिव्या अनिल कसबे (वय ३४ वर्षे व्यवसाय-गृहीणी, रा. चक्रपाणी वसहात-भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी आमन विकास कसबे (वय अंदाजे २० वर्षे, रा. महात्मा फुलेनगर एम.आय.डी.सी. भोसरी) व एका अल्पवयीन गुन्हेगारावर पोलिसांनी गुरुवारी (ता. २) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

१ एप्रिलला फिर्यादी दिव्या त्यांची मुलगी अनिषा हिला घेण्यासाठी मुलासह महात्मा फुलेनगर येथे नातेवाईकांडे आल्या. तेव्हा तिथे राहणारी फिर्यादीची जाऊ उज्ज्वला विकास कसबे ही दिव्या यांना म्हणाली की, ''तुझ्या नवऱ्याने माझ्यावर करणी केली आहे.'' त्यावेळी फिर्यादी दिव्या व उज्ज्वला यांच्यात  शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा उज्ज्वला यांची दोन्ही आरोपी मुले दिव्या यांना म्हणू लागली की, ''तुझ्या नवऱ्याने माझ्या आईवर करणी केली आहे आम्ही तुझ्या नवऱ्याला मारणार आहोत.'' असे म्हणून दोन्ही आरोपींनी दिव्या यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली व त्याच्यावर तलवारही उगारली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५२ भारतीय हत्यार कायदा कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.










Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories