news
clock
लाखो रुपयांचे मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना अटक, हिंजवडी पोलिसांची कामगिरी

लाखो रुपयांचे मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना अटक, हिंजवडी पोलिसांची कामगिरी

लाखो रुपयांचे मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना अटक, हिंजवडी पोलिसांची कामगिरी  

पिंपरी, ता. २ - अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सुरु असलेल्या तपासात हिंजवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ३५ वर्षीय गुन्हेगाराला वाकडमधून आणि त्याच्या साथीदाराला मुंबईतून अटक केली आहे. दोघांकडून लाखो रुपयांचे मेफेड्रोन (एम. डी.) जप्त करण्यात आले आहे. 

अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी २४ मार्च रोजी हिंजवडी पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना, 'एक इसम एम.डी. अंमली पदार्थ विक्रीकरीता चार चाकी गाडीतून विनोदे वस्ती-वाकड येथे येणार आहे',अशी बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार, गुन्हे शोध पथकाने  सापळा रचला.

 विनोदे वस्ती-वाकड येथे आल्हाट वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ संबंधित इसम अतुल शंकर बालगुडे (वय ३५ वर्षे रा. पाथरगाव ता. मावळ) यांस शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे एकूण ४ लाख २० हजार रुपये किंमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे मेफोड्रोन व ३ लाख २४ हजार २०० रुपये किंमतीची  चारचाकी व इतर मुद्देमाल सापडला. त्यानुसार, बालगुडे याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. बालगुडे याचा साथीदार शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) याला गोवंडी-मुंबई येथून अटक केली. सद्दामकडून एकूण २० लाख रुपये किंमतीचे २०० ग्रॅम मेफेड्रोन सापडले. दोन्ही आरोपींविरोधात दाखल गुन्हयामध्ये एकूण २७,५५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. शशिकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)), डॉ. बसवराज तेली (अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग)), विशाल गायकवाड (पोलीस उप आयुक्त परिमंडळ -२), बाळासाहेब कोपनर (सहाय्यक पोलीस आयुक्त, हिंजवडी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले, संदीप मासाळ, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अरुण पारधी यांनी केली आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories