भोसरीत तरुणांचा राडा, मारहाणीसह दगडफेक, मारहाण; पाच जण अटकेत

पिंपरी, ता. ५ -  जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांच्या टोळक्याने ३४ वर्षीय तरुणाला व त्याच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि दगडफेक व एका हॉटेलातील वस्तूंची फेकाफेकी करुनही मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास सद्रगुरुनगर-भोसरी येथे घडली.

याबाबत सतीश अर्जुन पाटील (वय ३४, रा. मंगलमुर्ती कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज सुखदेव लष्करे, रूषीकेश हरी लोहार, पार्थ वसंतखुने, सोहल जिलानी मुजावर आणि गोविंद लालु रूपवते या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश पाटील हे आपल्या मित्रांसोबत हवेली हॉटेलसमोर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपी गोविंद रुपवते याने फिर्यादीचा मित्र आसिफ शेख याच्याशी असलेल्या जुन्या वादाचा मुद्दा काढून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी तेथे बेकायदेशीर गर्दी जमवून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या दरम्यान आरोपींनी दगडफेकही केली. त्यामध्ये फिर्यादी सतीश पाटील यांच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले. तसेच त्यांच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली. आसिफ शेख हा बचावासाठी जवळील हॉटेलमध्ये पळाला असता आरोपींनी त्याचा पाठलाग करून हॉटेलमधील खुर्च्या, दगड आणि टेबलावरील पाण्याचे ग्लास फेकून मारत त्यालाही जखमी केले.

या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), १८९ (२), १९० आणि १९१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मांजरे करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance