news
clock
भोसरीत सराफाची ग्राहकाकडून ६.७९ लाखांची फसवणूक

भोसरीत सराफाची ग्राहकाकडून ६.७९ लाखांची फसवणूक

भोसरीत सराफाची ग्राहकाकडून ६.७९ लाखांची फसवणूक 

पिंपरी, ता. २ - तब्बल ६ लाख ७९ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले सराफाला बंद खात्याचा धनादेश देऊन त्याची फसवणूक केल्याची घटना १ फेब्रुवारीला भोसरी येथील न्यु गणेश ज्वेलर्समध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर भोसरी एमआडडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुलाब सिंग गेनसिंग चौहान (वय २४)  याबाबत फिर्याद दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतिश ज्ञानदेव वालसिंगे (वय सुमारे ४५ वर्षे) यांनी दुकानात येऊन ६,७९,०००/- रुपये किंमतीचे सोन्याची साखळी, लॉकेट आणि कडे असे दागिने आपला वाढदिवस असल्याचे सांगून घेतले. मात्र, पैसे देताना त्याने धनादेश दिला. खाते बंद हा धनादेश वटला नाही, तेव्हा फसवूक झाल्याचे समोर आले.  

आरोपी सतिश ज्ञानदेव वालसिंगे (वय अंदाजे ४५ वर्षे, रा. भोसरीगाव) याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक झालेला नाही. पोलिस आरोपीला शोधत आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories