कारची दुचाकीला मागून धडक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

कारची दुचाकीला मागून धडक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

भोसरी | ९ ऑक्टोबर २०२६ : भोसरीतील कासारवाडी ओव्हरब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव किआ कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रदीप वसंत दसगुडे (वय ३७,आळंदी रोड, भोसरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फिर्यादींचे वडील वसंत श्रीपती दसगुडे (वय ७३) हे पुण्याहून भोसरीकडे येत होते.

ते कासारवाडी ओव्हरब्रिजवरून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या किआ कंपनीच्या कार क्रमांक MH14 JE 3768 वरील चालकाने त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक MH14 KX 5550 हिला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत वसंत दसगुडे यांच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कारचालकाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories