काळेवाडीत किरकोळ वादातून तरुणावर चाकूने वार; चौघांविरोधात गुन्हा

काळेवाडीत किरकोळ वादातून तरुणावर चाकूने वार; चौघांविरोधात गुन्हा

काळेवाडी | ९ ऑक्टोबर २०२६ : पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका २७ वर्षीय तरुणाला चौघांनी संगनमत करून मारहाण केल्याचा प्रकार काळेवाडी परिसरात घडला. या मारहाणीत तरुणाच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला, तर डोक्यावर बांबूने मारून जखमी करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी दोन पुरुष आणि दोन महिलांविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पवन संजय वेदपाठक  (वय २७, व्यवसाय ड्रायव्हर, रा. नढे बिल्डिंग, नढेनगर, काळेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास नढेनगर येथील नढे बिल्डिंग परिसरात हा प्रकार घडला.

या प्रकरणी विजय शिवाजी अहिरे (वय २७), रोहित शिवाजी अहिरे (वय २५), एक २२ वर्षीय महिला आणि एक २४ वर्षीय महिला, सर्व रा. नढे बिल्डिंग, नढेनगर, काळेवाडी, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या पत्नीचे आरोपी क्रमांक दोन सोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन त्यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, चौघांनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर विजय अहिरे याने फिर्यादीच्या पोटावर चाकूने वार केला, तर रोहित अहिरे याने डोक्यावर बांबूने मारून जखमी केले, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories