news
clock

अचानक कारचा दरवाजा उघडल्याने ताथवडे येथे सायकलस्वार जखमी

पिंपरी, ता. १३ - अशोकनगर-ताथवडे येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने सायकलस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. ५ मार्चला हा अपघात घडला आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश केरप्पा निर्मल (वय ४०, रा. ऑस्टीन पार्क, ताथवडे) हे ५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास अशोकनगर येथील मेट्रो स्पोर्ट अरेना जवळ सायकलवरु जात होते. त्यावेळी रोडच्या कडेला उभ्या असलेल्या कारचा दरवाजा चालकाने मागे न पाहता  अचानक उघडला. त्यामुळे दरवाजा निर्मल यांच्या सायकलला धडकून अपघात झाला.

या अपघातात निर्मल यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन पायाच्या पंज्याला फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेप्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (अ), १२५ (ब) आणि ३२४ (४) अन्वये वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories