news
clock
८ लाख ३२ हजारांचा गांजा बाळगणाऱ्या दोघांना ओटा स्कीम-निगडी येथून अटक

८ लाख ३२ हजारांचा गांजा बाळगणाऱ्या दोघांना ओटा स्कीम-निगडी येथून अटक

ओटा स्कीम-निगडी येथून ८ लाख ३२ हजारांचा गांजा जप्त, दोघांना अटक 

पिंपरी, ता. १३ - एकूण ८ लाख ३२ हजार ३००/- किंमतीचा ४४६ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी ओटा स्कीम-निगडी परिसरात एका २६ वर्षीय युवकाकडून गुरुवारी (ता. १२) जप्त केला आहे. या युवकाला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवरही चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सुरेश पवार (वय २६ वर्षे, रा. ओटास्किम,निगडी) व बळीराम मोहीते हे दोन गांजा बाळगणारे आरोपी आहेत. राजेंद्र पवार याच्याकडे  एकूण ८,३२,३००/- रु किंमतीचा ४४६ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. हा गांजा त्याने बेकायदेशिररित्या विक्रीकरीता बाळगला होता. त्याच्यातडे एक विवो कपंनीचा मोबाईल व एक बलेनो कारही मिळाली आहे. हा गांजा त्याने  कोणाकडून आणला याबाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने बळीराम मोहिते याच्याकडून गांजा विक्रीकरीता आणल्याचे सांगितले. 

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), ? ( overline a ) (ii)(3T) * R प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories