news
clock

 नवले पूल चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

पुणे, ता. १२ - नऱ्हे येथील नवले पूल चौकात  शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण अपघातात दुर्घटनेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. कात्रजकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकी व चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिल्याने एकूण सहा वाहनांचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार मरण पावला. 

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. ही धडक फार जोराची होती. काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 

माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories