भाजप पिंपरी-चिंचवड 'उत्तर भारतीय मोर्चा' कार्यकारिणी जाहीर, नियुक्तीपत्रांचे वाटप

भाजप पिंपरी-चिंचवड 'उत्तर भारतीय मोर्चा' कार्यकारिणी जाहीर, नियुक्तीपत्रांचे वाटप

 भाजप पिंपरी-चिंचवड 'उत्तर भारतीय मोर्चा' कार्यकारिणी जाहीर, नियुक्तीपत्रांचे वाटप

पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा 'उत्तर भारतीय मोर्चा' (प्रकोष्ठ) च्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य नियुक्तीपत्र वाटप सोहळा नुकताच  पार पडला.

काळेवाडी फाटा येथे झालेल्या ​या विशेष सोहळ्यास भाजप पिंपरी चिंचवड शहर प्रभारी श्री भरत (नाना) पाटील,आमदार शंकरशेठ जगताप,आमदार उमा खापरे व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​या सोहळ्यात उत्तर भारतीय मोर्चाच्या विविध पदांवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पक्षाने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवत शहरात उत्तर भारतीय बांधवांना संघटित करून भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

​या प्रसंगी संगठन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस मधुकरभाऊ बच्चे, सरचिटणीस वैशाली खाडये, नगरसेविका स्नेहा कलाटे, नगरसेविका अर्चना तापकीर, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संतोष ओझा, धनराज बिर्दा, भाजपचे विविध लोकप्रतिनिधी, शहर पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि उत्तर भारतीय समाजातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​उत्तर भारतीय समाज भाजपचा भक्कम पाठीराखा

''शहराध्यक्ष शत्रुघ्न राट "पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. भारतीय जनता पार्टीवर उत्तर भारतीय बांधवांचा नेहमीच भक्कम विश्वास राहिला आहे. आज जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून उत्तर भारतीय समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे,केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि पक्षाचे संघटन बूथ पातळीवर अधिक मजबूत करण्याचे काम हे नवनिर्वाचित पदाधिकारी पूर्ण निष्ठेने करतील, असा मला विश्वास आहे." - शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories