news
clock
महिलांच्या कर्तृत्वाची प्रचिती ब्रह्माकुमारींमध्ये दिसून येते - तृप्ती देसाई

महिलांच्या कर्तृत्वाची प्रचिती ब्रह्माकुमारींमध्ये दिसून येते - तृप्ती देसाई

महिलांच्या कर्तृत्वाची प्रचिती ब्रह्माकुमारींमध्ये दिसून येते - तृप्ती देसाई

पिंपरी, ता. १६ - ''महाशिवरात्रिनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने सहस्त्र शिवलिंग दर्शन व अर्धनारीयश्‍वर हा जीवंत देखावा सादर करुन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. हे स्तुत्य आहे. महिलांनी स्वबळावर आपले कर्तृत्त्व सिद्ध केले पाहिजे आणि याची प्रचिती ब्रह्माकुमारींमध्ये दिसून आली.'', असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या. 

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांच्या वतीने  बाणेर येथील  ब्रह्माकुमारीज सेंटरमध्ये सहस्र शिवलिंग दर्शन व अर्धनारीयश्‍वर जीवंत देखावा आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन तृप्ती देसाई यांच्या हस्ते झाले.

 देसाई म्हणाल्या, ''भू-माता ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो. महिलांनी स्वबळावर आपले कर्तृत्त्व सिद्ध केले पाहिजे आणि याची प्रचिती ब्रह्माकुमारीमध्ये दिसून आली.''

यावेळी नाट्य दिग्दर्शक-नृत्यांगना वैशाली जाधव, संजय कृष्णा रायकर, घन्यशाम रायकर, ब्रह्माकुमारी बाणेर शाखेच्या संचालिका डॉ. त्रिवेणी दिदी, सकाळनगरच्या संचालिका बी.के.गीता दिदी सहित ब्रह्माकुमारी मधील सदस्य, आरोग्य शिबीराचे डॉक्टर उपस्थित होते. आरोग्य शिबीराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. एकूण ४८ नागरिकांनी रक्कतदान केले. डॉ. मंगेश यांचे मार्गदर्शन झाले.

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories